अकोला : चोरी गेलेला आणि चोरट्यांकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधित लोकांना देण्यात येत नव्हता.मात्र येथील जिपो अधीक्षक जी.श्रीधर यांनी जप्त मुद्देमाल संबंधितांना देण्याचा उपक्रम सुरू केला असून शनिवार 30 जानेवारी रोजी असाच मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने शनिवार 30 जानेवारी रोजी सर्व पोलिस स्टेशन स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीला परत करण्याची मोहीम राबवून यात 13 वाहने ज्यांची किंमत 5,30,000, 63 मोबाईल किंमत 745800, सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम किंमत 812161 व इतर मुद्देमाल 268175 असा एकूण 23,56,136 रुपयांचा मुद्देमाल 30 जानेवारी रोजी तक्रारकर्त्यांना परत करण्यात आला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोकॉ गणेश धुंपटवाड गुन्हे शाखा, अकोला व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलिस स्टेशनचे मुद्देमाल मोहरर यांनी ही कारवाई केली. पुढेही अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीला परत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.