• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मिशनबिगीन अंतर्गत 28 फेब्रुवारीपर्यंत आदेश कायम – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
February 2, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
Collector Akola
27
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून त्याची मुदत दि. 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता आदेश निर्गमित

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

यापूर्वी देण्यात आलेले आदेशातील दिशानिर्देश 28 फेब्रुवारी पर्यंत कायम ठेवण्यात येत आहेत, तसेच ज्या आस्थापना व उपक्रमांना यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशान्वये वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे त्या आस्थापना व उपक्रम 28 फेब्रुवारी पर्यंत जशे सुरु आहेत तसेच सुरु राहतील, सर्व प्रकारच्‍या अत्‍यावश्‍यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने व आस्‍थापना तसेच इतर दुकाने व आस्‍थापना यांना यापूर्वी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवणे बाबत परवानगी देण्‍यात आली होती. ती आता 28 फेब्रुवारी पासून सकाळी नऊ ते रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत परवानगी देण्‍यात येत आहे, कंटेन्‍टमेंट झोन क्षेत्राच्‍या बाहेरील क्रिडा स्‍पर्धेचे आयोजन, बैठक, विविध क्रिडा उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या विविध संस्‍थांना ज्‍यामध्‍ये राज्‍य, राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील खेळाडू प्रशिक्षण घेतात अशा संस्‍थांना 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करण्‍याकरिता परवानगी देण्‍यात येत आहे. यामध्‍ये अकोला जिल्ह्यामध्‍ये सुरु असलेल्‍या विविध क्रिडा प्रशिक्षण संस्‍थाचा समावेश असेल या बाबत क्रिडा युवक व युवक कल्‍याण संचालनालय यांनी स्‍वतंत्रपणे निर्गमित केलेल्‍या मानक कार्यप्रणालीचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

कंटेन्‍टमेंट झोन क्षेत्राच्‍या बाहेरील विविध प्रकारच्‍या शासकीय प्रशिक्षण संस्‍था उदा. यशदा, वनामती, मित्र, मेरी ई. यांना त्‍यांचे प्राशिक्षण संस्‍थाद्वारे प्रशिक्षण सुरु करता येतील. या बाबत संबंधीत प्रशासकीय विभाग यांनी याबाबत स्‍वतंत्रपणे निर्गमित केलेल्‍या मानक कार्यप्रणालीचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस यांना त्‍यांचे वर्ग 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करण्‍याकरिता परवानगी देण्‍यात येत आहे. खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस यांनी त्‍यांचे वर्ग सुरु करतांना प्रत्‍येक बॅचमध्‍ये नियमीत आसन क्षमतेच्‍या 25 टक्के किंवा जास्‍तीत जास्‍त 20 विद्यार्थी राहतील तसेच दोन बॅचच्‍या मध्‍ये अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल व रुमचे तसेच संगणक साहीत्‍याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील, कोविड-19 चे अनुषंगाने केन्‍द्र शासन व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील, या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या विविध आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही याची संबंधीत संचालकांनी व संस्थेने दक्षता घेण्‍यात यावी.

हे आदेश दि. 28 फेब्रुवारीच्या मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: मिशनबिगीन
Previous Post

बाळापूर : लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

Next Post

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

rape

गुन्हेगारी ः १५ वर्षांच्या मुलीवर १७ जणांकडून सलग ५ महिने वारंवार बलात्कार; पीडितेची मावशीच मुख्य आरोपी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.