तेल्हारा – वीज संशोधन कायदा 20,कामगार कायदा, नवीन 3 शेतकरी कायदे हे सर्व सामान्य माणसाच्या विरोधात असून हे कायदे केले मागे घ्यावे आणि महावितरण मधील खाजगीकरण ची मालिका थांबवून वीज उद्योग टिकवण्यासाठी आपण सर्व लोकांनी तय्यार राहावे जेणे करून हा सर्व सामान्य जनतेच्या मालकीच वीज उद्योग टिकेल असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे कार्याध्यक्ष कॉ सि एन देशमुख यांनी तेल्हारा येथे अकोट विभाग द्वारे आयोजित सेवा कार्यगौरव सोहळा व भव्य कार्यकर्ता मेळावा दरम्यान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सल्लागार कॉ दुधाळे, संयुक्त सचिव कॉ सनगाळे, कॉ शैलेश तायडे, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य कॉ पी जी ढोले, कॉ जी जे देशमुख कॉ अकोला झोनल अध्यक्ष कॉ संतोष कोल्हे, सचिव कॉ एन वाय देशमुख, कॉ सतीश नवले, कॉ प्रदीप ढेंगे ,कॉ कॉ ढवळे कॉ गोठवाल ,कॉ मगर,कॉ सुनीता पाटील जिल्हा अध्यक्ष आयठक कॉ झुंजारे मंचावर उपस्थित होते ,यावेळी शाखा ततेल्हारा च्या वतीने महावितरण मधून सेवानिवृत्त झालेले कॉ सि एन देशमुख ,कॉ सनगाळे, कॉ ढवले, कॉ प्रदीप ढेंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
अकोट विभागात संघटना सामूहिक रित्या सर्व कामगार यांच्या समस्या निकाली काढत असून पुढे सुद्धा कर्मचारी यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही देऊन कॉ सि एन देशमुख यांनी अकोट विभाग मधील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचं अभिनंदन केले. या दरम्यान प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा आपलं मार्गदर्शन केले ,दरम्यान महाराष्ट्र स्टेट इले वर्कर्स फेडरेशन ची नवीन कार्यकारीणी कार्याध्यक्ष कॉ सि एन देशमुख यांनी जाहीर केलीअकोट विभाग अध्यक्ष पदी कॉ योगेश राऊत आणि सचिव पदी कॉ अफसर शाह अन्वर शाह ,महिला।प्रतिनिधी कॉ सुनंदा अतुल काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याच प्रमाणे तेल्हारा शाखा अध्यक्ष पदी कॉ संजय माकोडे सचिव पदी कॉ विठ्ठल शेळके ,अकोट शाखा अध्यक्ष पदी कॉ बराह सचिव पदी कॉ हर्षल जांभोळे यांची निवड करण्यात आलीकार्यक्रमाचे सूत्र संचालन कॉ अफसर शाह आभार प्रदर्शन कॉ नीलेश मगर यांनी केले कार्यक्रमाला अकोट विभागामधील सर्व सभासद ,महिला प्रतिनिधी उपस्थित होते