अकोट शहरात आपसी वादातून युवकास चाकुने भोसकले,युवक गंभीर जखमी,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोट (शिवा मगर)- अकोट शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंबोळी वेस भागातील कब्रस्तान जवळ दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेमध्ये आपसी वादातून एका युवकास चाकूने भोसकल्याची घटना घडली. या घटनेमध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले आहे. युवकाच्या बहिणीने अकोट शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कब्रस्तान जवळ आंबोळी वेस भागात दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान शेख अब्रार शेख बाबू वय 25 वर्ष या युवकाने आंबोळी वेस भागातीलच मुस्तकीम, फिरोज, नफीज, व इरफान या चार जणांनी जनावर कत्तल करून घाण टाकलेच्या कारणावरून मनाई केली असता त्यांनी उलट त्याच्याशी वाद घालीत त्याच्यावर त्यांनी चाकुने व लोखंडी पाईप ने मारहाण करून जीवघेना हल्ला केला त्यामुळे शेख अब्रार शेख बाबू हा गंभीर जखमी झाला असून घटनेची तक्रार त्याची बहिण शबाना खातून सिद्दीक खान ने अकोट शहर पोलीस स्टेशन ला दिली असून मुस्तकीम, फिरोज, नफीज व इरफान या चार जणांविरुद्ध कलम 307,34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस स्टेशन करीत आहे.