नवी दिल्ली : सीबीएसईची दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ४ मे पासून सुरु होणार आहे. ही परीक्षा १० जून पर्यंत संपेल. तर परीक्षेचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर होईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे.
रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, कोणत्या विषयाची परीक्षा कोणत्या तारखेला होईल, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जारी केलेले नाही. सीबीएसई आपली अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर डेटशीट्स अपलोड करणार आहे.
कोरोनामुळे सीबीएसई बोर्डाने दोन्ही वर्गांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्याशिवाय बोर्डाने पेपर पॅटर्नमध्येही काही बदल केले आहेत.
Announcing the date of commencement for #CBSE board exams 2021. @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @cbse @mygovindia @MIB_India @PIB_India @DDNewslive https://t.co/PHiz3EwFvz
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 31, 2020