पिंपरी : ‘टिंडर अॅप’वर मैत्री झालेल्या एका तरुणाने एका हवाई सुंदरीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 26) रात्री काळेवाडी येथे घडला. अभिजित सीताराम वाघ (31, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवाई सुंदरीने रविवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई सुंदरी आणि आरोपी अभिजित यांची ‘टिंडर अॅॅप’वर मैत्री झाली. या ओळखीचा फायदा घेत अभिजित याने तिला हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
त्यावेळी हवाई सुंदरीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अभिजित याने तिला मारहाण करीत पैशाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संगीत गोडे करीत आहेत.