अकोट (देवानंद खिरकर)– स्थानिक संत गाडगे महाराज सभागृहात दि 4/12/20 ला योग मुद्रा शिबीर घेण्यात आले या प्रसंगी योग मुद्रा शिबीराला सेवानिवृत्त श्री रवटोड गुरूजी यांनी उपस्थीत महिला व पुरुष यांना योग मुद्रा संबधी विना औषधउपचार घेता अनेक आजार योग मुद्रा करुन बरे करण्याबाबत मार्गदर्शन केले . याच कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव गुजरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या वतीने व्यवस्थापक श्री गजानन राऊत यांनी श्री विठ्ठलराव गुजरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला तसेच श्री मधुकरराव दादा सपकाळ डॉ लायसे साहेब कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला या वेळी श्री गुजरकर यांनी जागतिक अपंग दिना निमित्त गावातील कर्तवगार व हुशार अंपग तरुणा अंकुश कात्रे याला गणवेश देऊन सन्मान केला.
सदर कार्यक्रमाला गजानन सपकाळ गुरुजी श्री मधुकरराव बेदरकर श्री डीगांबर भाऊ सपकाळ श्री आग्रे भाऊ श्री माधवराव दातकर श्री माधवराव पळसकर शिवशंकर सोनोने प्रशांत गुजरकर धनराज गवई बंडू गवई आदी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन गजानन राऊत तर आभार प्रदर्शन
नरेश पुनकर यांनी मानले .