पातुर (सुनिल गाडगे) : हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने एमबीबीएस प्रवेश पात्र झालेल्या पातुर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी कुमारी पल्लवी पांडुरंग गोतरकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी पातुर येथील शनिवार पुरा भागात आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आला यावेळी कोरोना चा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून पातूर येथील पत्रकार बांधवांना आणि ग्रामस्थांना मास्क चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदू खाटीक महासंघ सघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते शांताराम बावणे होते.
या कार्यक्रमात कुमारी पल्लवी गोतरकर हिने कठोर परिश्रम कष्ट आणि मेहनत घेऊन एमबीबीएस पात्र ठरली आहे याकरता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन हिंदू खाटीक महासंघाच्या वतीने दिनेश गोतरकार आणि हिंदू खाटिक महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला तर पातुर तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने देवानंद गहिले आणि इतर पत्रकार पदाधिकार्यांच्या वतीने कुमारी पल्लवी तसेच तिचे आई-वडील आजोबा यांचा सत्कार करण्यात आला तसेच पातुर शहर व तालुक्यातील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले, अमोल करवते ,सुनील गाडगे ,अजय शिंदे ,अविनाश पोहरे, किरण कुमार निमकर्डे, दैनिक लोकमतचे प्रशांत गवई,तोकिर अहेमद ,जुबेर भाई, राम वाडी ,आकाश हिवराळे ,प्रविन पोहरे ,पंकज पोहरे,हसन बाबू आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला आहे.
या सत्काराला उत्तर देताना मला एमबीबीएस करून एमडी व्हायची इच्छा पल्लवी गोतरकर हिने व्यक्त करून गोरगरीब जनतेची सेवा करायचे असल्याचे मनोगत सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले तर पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी करता पत्रकार यांचा पुढाकार असतो त्यामुळे पत्रकारांचा सत्कार केल्यामुळे काम करण्याची जिद्द आणि प्रेरणा मिळते असे मनोगत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले यांनी व्यक्त केले आहे .या कार्यक्रमात देवानंद गहिले यांनी आपले विशिष्ट कला सादर करून विविध प्राण्यांचे आवाज काढून उपस्थितांची मने जिंकली आणि एका सुंदर कवितेचे सादरीकरण केले ज्यामुळे त्यांच्या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी चंदू भाऊ गोतरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंदू खाटीक महासंघाचे अध्यक्ष दिनेश गोतरकर यांनी केले या कार्यक्रमाला हिंदू खाटीक महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुखदेवराव गोतरकर ,शांताराम बावणे ,चंद्रकांत गोतरकर ,मनोहर गोतरकर ,दिगंबर गोतरकर ,विजय गोतरकर ,रवींद्र गोतरकर ,गजानन गुजर, नरेश गोतरकर ,गोपाल गोतरकर,दिनेश गोतरकर, सुरेश लसनकार ,योगेश गोतरकर, विशाल गोतरकर, अरविंद माकोडे ,श्याम गुजर, सागर गुजर ,श्याम कराळे ,अक्षय माकोडे ,रुद्रा बावणे ,नागेश भाऊ बावणे,स्वप्निल गोतरकार ,अतुल गोतरकर, मनीष बावणे ,शंकर गुजर ,संदीप सूर्यवंशी ,गौरव माकोडे ,शिवा गुजर ,गौरव राहूळकर ,प्रमोद गोतरकर, अमर गोतरकर ,यश गोतरकर ,आकाश गोतरकर, आकाश माकोडे ,शुभम गोतरकर, महादेव माकोडे ,विकी लसूनकार, सचिन रावळकर,पवन रावळकर अक्षय राहू ळकर, नितीन राहूळकर, दत्ता माकोडे संतोष लसनकार अजय कराळे, राजेश गोतरकर ,राजेश गुजर ,उमेश कराळे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा डिस्टनसी चे पालन आणि सॅनिटायझर चा वापर करून करण्यात आला असून स्वतःची सुरक्षा स्वतः च करा असा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला