तेल्हारा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत संविधान सप्ताहानिमित्त भीमराव परघरमोल यांचे ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले.संविधान सप्ताहानिमित्त भारताच्या जडणघडणीत संविधानाचा महत्त्वाचा वाटा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले असता प्रमुख वक्ते म्हणून भिमराव परघरमोल (लेखक तथा फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासक तेल्हारा) हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तेलगोटे सर (स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय सिरसोली) यासह प्रमुख उपस्थितीमध्ये विजय बेदरकर (जिल्हा प्रकल्प अधिकारी) तथा सविताताई गवई (सरपंच काळेगाव) ह्या होत्या.नियोजित विषयावर आपले विचार मांडताना भिमराव परघरमोल यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधान निर्मितीच्या प्रक्रियेपासून तर सविधान स्वीकृती पर्यंतचा प्रवास व त्याची अंमलबजावणी सोबतच संविधान सुरक्षा सन्मान व संवर्धन ही प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे,कारण मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडण्याचे ते महत्तम साधन आहे.असे विचार त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील समतादूत यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन हे मुख्य आयोजक शुभांगी राजेंद्र लव्हाळे यांनी केले तर कार्यक्रम अनेक नागरिकांनी ऑनलाइन बघितला व श्रवण केला.