तेल्हारा : प्रत्येक नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता अभिमान व सन्मान व्यक्त करणारे सोनेरी दिवस भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समता स्वातंत्र्य बंधुभाव मूलभूत त्रिमुल्यांमुळे मानवी कल्याणाचा मार्ग मजबूत करणारा भारतीय संविधान दिनाचा 70 वा वर्धापन दिन सोहळा आज आशीर्वाद टायपिंग इन्स्टिट्यूट हॉलमध्ये शहर भाजपाच्या वतीने साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर शहर सरचिटणीस रवि गाडोदिया उपाध्यक्ष विजय देशमुख तालुका प्रसिद्धीप्रमुख रवी शर्मा यांची उपस्थिती होती भारताच्या संविधान प्रास्तविकचे याप्रसंगी वाचन करण्यात आले तसेच यावेळी 26/11च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.