पुणे : कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम कंपनीत तयार होत असल्याने याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील शंभर देशाचे राजदूत पुण्यातील सीरम कंपनीला भेट देणार आहेत. याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत.
राजदूतांच्या दौर्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दि. 27 रोजी राजदूत सीरमला भेट देणार असून नरेंद्र मोदींचा दौरा अद्याप आलेला नसून 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांच्याकडे दैनिक पुढारीला सांगण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून ‘मिनिट टू मिनिट टू’ कार्यक्रम निश्चित केला आहे. दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत.
करोनाच्या लशीचा सद्यस्थितीची आढावा घेण्यासाठी 100 देशांचे राजदूत येत्या शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. दिल्ली येथून 98 तर मुंबईहून दोघे राजदूत पुण्यात दाखल होणार आहेत. या 100 राजदूत दोन गटांमध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’ तसेच हिंजवडी येथील ‘जिनोव्हा बायो-फॉर्मासिटिक्युअल्स’ला भेट देणार आहेत. अॅस्ट्राझेनका कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर या 100 देशांच्या राजदुतांची पुणे भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.