सोलापूर : आज सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या घरातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा कट केला असता वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा, प्रदेश प्रवक्ता व युवक आघाडीचे प्रदेश महासचिव मा. राजेंद्रभाऊ पातोडे अणि प्रदेश प्रवक्ता मा. आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर सदर व्यक्तीच्या घरातील विद्युत पुरवठा पुन्हा जोडुन देण्यात आला. कोरोनाच्या काळात अवाढव्य विजबील देवून जनतेला वेठीस धरण्यात येत असतांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला आव्हान केले होते कि “शासनाने विजबील सवलत देई पर्यंत विजबील भरू नये. बिल थकित राहिल्यामुळे जर विज पुरवठा खंडित केल्या गेला तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ती पुन्हा जोडुन दिल्या जाईल.” आज साहेबांच्या शब्दानुसार युवक आघाडीचे वतीने सोलापुरातील विज पुरवठा जोडून जनतेच्या पाठीशी वंचित सदैव तत्पर रहिल हे दाखवून दिले. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा नेते विजयभाऊ तायडे पुरुषोत्तमभाऊ अहिर सह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.