अकोला (सुनिल गाडगे): ओबीसी मधील अठरापगड जाती ला बाहेर काढण्यासाठी काही नेत्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे ओबीसी आरक्षणाला छेद देण्याचे षडयंत्र असून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी राज्यात आता ओबीसी समाज याला प्रखर विरोध करत असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या आंदोलनात उडी घेतली असून ओबीसी वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी दिला आहे,त्या साठी नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली,या प्रसंगी प्रा.तुकाराम बिडकर बोलत होते,यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा मायाताई ईरतकर महानगराध्यक्ष ज्योती भवाने महानगर कार्याध्यक्ष प्रा.श्रीराम पालकर, प्रा.विजय उजवणे, सुभाष वाईनदेशकर, यांनी मार्गदर्शन केले.
या संदर्भात २ डिसेंबर रोजी दुपारी 2 वा स्वराज्य भवन येथुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यात ओबीसी सबंधीत अनेक मागण्या चे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. तरी ओबीसी मधील सर्व समाजानी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला महादेव साबे,सुरेंद्र उगले, गजानन बारतासे, सुनील उंबरकर, कैलास इंगळे,परशराम बंड, रामदास नवलकर,वर्षाताई बगाडे,दिपमाला खाडे, शारदा थोटे,पुजाताई गाडगे, तुळसाबाई गाडगे, ज्योती भवाने, बाळकृष्ण काळपांडे, ज्ञानेश्वर बोदडे, रामदास नवलकर, नंदकिशोर बहादुरे आदी उपस्थित होते.