नवी दिल्ली : प्रत्येक व्यवहारात पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी, इन्कम टॅक्स भरण्यासाठी, लोन, वाहन अथवा इतर मोठ्या वस्तुंची खरेदी करताना पॅन कार्ड महत्त्वाचे ठरते. अनेकदा काही कारणास्तव पॅन कार्ड हरवते तर काही लोकांना नवीन पॅन कार्ड तयार करायचे असते. अशा ग्राहकांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या १० मिनिटात आता घरबसल्या पॅन कार्ड तयार करता येणार आहे.
घरबसल्या काही मिनिटांत सोप्या पद्धतीने पॅन कार्ड काढणे आता शक्य झाले आहे. पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे. फक्त १० मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येते. मात्र ई-पॅन कार्डसाठी आधार क्रमांक देणे गरजेचे आहे.
ऑनलाईन ई-पॅन कार्ड कसे तयार करायचे जाणून घ्या.
सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जा.
Instant PAN through Aadhaar हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल.
Get New PAN या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाका.
कन्फर्म सेक्शनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा.
आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.
फोनवर आलेला ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा.
आयकर विभाग ही माहिती व्हेरिफाय करेल आणि दहा मिनिटांत e-PAN मिळेल.