अकोला : डाक सेवे बाबत जसे टपाल स्पीड पोस्ट, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतची आपली तक्रार सहा आठवड्या पेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी आपण डाक अदालत मध्ये दाद मागू शकता.
अनुत्तरीत तक्रार बाबत अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिका-याकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी, आपली तक्रर दि.25 नोव्हेंबर 2020 पुर्वी सक्षम अथवा पोस्टाने पाठवावी.
डाक अदालत दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. कार्यालय प्रवर अधिक्षक ,डाकघर अकोला विभाग, अकोला सिव्हील लाइन्स अकोला-444001 येथे भरेल. त्यामध्ये सदर व्यक्तीस स्वत:चे खर्चाने हजर राहता येईल. असे आवाहन प्रवर अधिक्षक, डाकघर अकोला विभाग, अकोला सिव्हील लाइन्स अकोला-444001 यांनी केले आहे.