अकोट(देवानंद खिरकर) – जाहिर केलेल्या परिपत्रकानुसार उन्हाळी २०२० विद्यापीठ परीक्षेमध्ये असंख्य प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत.परीक्षा विभागात निमार्ण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युध्द पातळी वर प्रयत्न करत आहात. तांत्रिक अडचणी नाहिसा होणार नाहीत परंतु MQC पध्दती ने आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी तयार नाहित हे सत्य आहे. या तून काहि मार्ग काढणे आवश्यक आहे. या करीता युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे व जिल्हा समन्वयक मुकेश निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने आकोट तलसिलदाराना निवेदन दिले.
निवेदनाद्वारे पुढील प्रस्ताव दिला.
दि. २९ एप्रिल २०२० रोजीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा मार्गदर्शन सूचनेनुसार विद्यापिठ अंत्यत कमी कालावधीत आयोजन करावै व यु. जि. सी ने वेळोवेळी केलेल्या चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टम (CBSC) आवश्कता सह त्याचे पालन करावे, यासाठी ओपन बूक परीक्षा पर्यायाचा वापर परीक्षा सुचित करण्यास सुचविले आहे.या आठी OBEपर्यायांचा वापर करून इ-मेल किंवा व्हाट्सएपवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना प्ठवली जाऊ शकते. त्यामुळे कमी इंटरनेट चा वापर होऊन तांत्रिक अडचणी कमी होऊ शकतात.या निवेदन वेळी युवासेना विस्तारक राहूल कराळे, युवासेना जिल्हा समन्वयक मुकेश निचळ, तालूका संघटक कुणाल कुलट शिवा रेडे वैभव जगताप विजय भारसाकळे गौरव हिंगणकर अमित बेंडवाल देव नृपनारायण गोविंदा चावरे शुभम चोपडे शुभम नकवाल संकेत गीते आदी युवासैनिक उपस्थित होते