मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर, अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतीचे नुकसान, खरडून गेलेली शेती यासाठी असेल. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना ही मदत पोहोचवली जाईल, अशी घोषणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीचे १० हजार प्रतिहेक्टर मदत २ हेक्टरपर्यंत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही मदत दिवाळीपर्यंत देण्याचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबतची आढावा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.
फळबाग क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये, पाणीपुरवठ्यासाठी १ हजार कोटी, रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना ३० हजार ८०० कोटींची विविध आपत्तीसाठी मदत आतापर्यंत दिली आहे. आतापर्यंत एवढी मदत कोणीही दिली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
राजकारण करु नका, असे आवाहन त्यांनी यावेळी विरोधकांना केले.