अकोला(प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळा जाहीर सभा आणि मिरवणूक रद्द करण्यात आली असून केवळ ऑनलाईन सभा आणि सामूहिक वंदना एवढेच मर्यादित कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे प्रमुख मार्गदर्शनात धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा केला जातो.त्यानिमित्ताने भव्य मिरवणूक आणि जाहीर सभेचे आयोजन केले जाते.ह्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने मिरवणूक आणि जाहीर सभा न घेता प्रातिनिधिक कार्यक्रम करण्याचे जिल्हा प्रशासनास बैठकीत सांगितले गेले होते.
मात्र सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे खासदार राऊत ह्यांनी जाहीर केल्याने आपणही जाहीर सभा आणि मिरवणूक काढायचे असे पदाधिकारी ह्यांनी ठरविले होते.
आज सेनेचा मेळावा रद्द झाल्याचे जाहीर होताच बौद्ध महासभा आयोजित मिरवणूक व जाहिरसभा रद्द करण्याचा निर्णय पदाधिकारी ह्यांनी घेतला.मर्यादित संख्येत आणि नियमांचे पालन करून ऑनलाईन सभा व सामूहिक वंदना घेण्याचे ठरविले गेले.त्याबाबत बौद्ध महासभा पत्रक काढून सविस्तर माहिती देणार आहेत.
ह्या विषयी आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बौद्धमहासभा महासचिव एम आर इंगळे, भाऊसाहेब थोरात, विजय जाधव, महानगर अध्यक्ष विश्वास बोराळे, महासचिव किरण पळसपगार जिल्हा संघटक रामेश्वर गायकवाड सर, प्रामुख्याने उपस्थित होते