घोडेगाव(प्रा विकास दामोदर)- शेतकऱ्यांसाठी निसर्गाची चालू असलेली अवकृपा व त्यातही त्यांचा असणारा जोडधंदा ते म्हणजे गोधन या गोधनावर देखील लंम्पि नावाचा प्राणघातक रोग लंम्पि स्किन डीसीस, गुरांमध्ये याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घोडेगाव येथे घरोघर जाऊन गुरांना लंम्पि प्रतिबंधक लस देण्यात आली यात जवळपास 300ते 350 गुरांना यशस्वी रित्या लस देण्यात आली.
यामध्ये डॉ. एम. ए. दांदळे (पशुधन विकास अधिकारी ),यांच्या मार्गदर्शनात डॉ. पि. टी. शेंडे (पशुधन पर्यवेक्षक ), डॉ. गोविंद पोहरकार (पशुधन सेवक )डॉ. विजय हेरोडे, डॉ. प्रणित मानखैर इ. चे सहकार्य लाभले.