अकोट (देवानंद खिरकर)- अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला हफिजउल्लाखा शाबीरउल्लाखा पटेल रा.मोहाळा यांनी दिलेल्या फिर्याद वरुन त्यांचे गायवाड्यामधे उभा असलेल्या टावरची लाइफ स्टार कंपनीची बेटरी किंमत 8000 हजार रुपये व फिर्यादीचा भाऊ यांचे पोपटखेड रोड अकोट वरील जेपिजी जिनिंग मधिल ईनव्हटरची बेटरी किंमत अंदाजे 5000 हजार रुपये असा एकुण 13000 हजार रुपयेचा कोणीतरी अन्यात ईसमाने चोरून नेला आहे.अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे.अपराध नंबर 402/2020 कलम 379 भादवी प्रमाणे अन्यात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.चोरीचा गुन्हा उघडकिस आणणे कामी तात्काळ ठाणेदार न्यानोबा फड यांनी डी बी पथक यांना मार्गदर्शन करुन सुचना दिल्यावरुन पथकातील कर्मचारी यांंनी अवघ्या 8 तासात चोरीच गुन्ह्यातिल आरोपींचा शोध घेवून सदर गुन्ह्यात आरोपि नितीन श्रीकुष्ण ठाकरे वय 29 वर्ष रा.सुकळी याचे कडून चोरी गेलेली टॉवरची बेटरी किंमत 8000 हजार रुपये व ईनव्हटरची बेटरी किंमत 5000 हजार रुपये असा एकुण 13000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.न्यायालयाने आरोपिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.सदरची कारवाई मा.जी.श्रीधर साहेब जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला,मा.सुनिल सोनवणे साहेब एस डी पी ओ अकोट,यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार न्यानोबा फड साहेब,गुन्हे शोध पथकाचे गजानन भगत,भास्कर सांगळे,नंदकिशोर कुलट,अजय माहोरे यांनी केली आहे.