अकोला :- रेल्वे कडून दसरा, दिवाळी करिता १९६ स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या स्पेशल रेल्वे २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान चालवण्यात येणार आहेत.
अकोला मार्ग मुंबई – हटिया (साप्ताहिक), मुंबई – विशाखापत्तनम (साप्ताहिक), ओखा – हावडा (साप्ताहिक), हैदराबाद – जयपूर (द्वि – साप्ताहिक), अमरावती – तिरुपती (द्वि – साप्ताहिक) या ५ स्पेशल रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
या स्पेशल रेल्वे सोबतच पुरी – सुरत आणि पुरी – मुंबई या स्पेशल रेल्वे सुद्धा चालवण्यात येणार आहेत. परंतु पुरी – सुरत आणि पुरी – मुंबई या नियमित रेल्वे ला अकोला मध्ये थांबा नाही. त्यामुळे स्पेशल रेल्वे ला थांबा असेल या बाबत साशंकताच आहे.
सध्या सुरु असलेल्या खुर्दा रोड – सुरत, खुर्दा रोड – अहमदाबाद (बडनेरा येथे थांबा) या स्पेशल रेल्वे ला अकोला मध्ये थांबा नाही.
खुर्दा रोड – सुरत, खुर्दा रोड – अहमदाबाद, पुरी – सुरत आणि पुरी – मुंबई या स्पेशल रेल्वे ला अकोला मध्ये थांबा मिळावा या बाबत रेल्वे मंत्रालय व खासदार यांना रेलवे प्रवासी संघाकडून विनंती करण्यात येणार असल्याची माहिती आहे .