अकोला(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये घटित सामूहिक बलात्कार व हत्याकांड हे मानवतेला काळीमा फासणारी आहे. आरोपींचा खटला फास्ट ट्रॅकन्यायालयात चालवून दोषी आरोपींना जाहीर फाशी देण्यात यावी, अशी मागणी एकलव्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण यांनी राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. समीर पठाण यांनी आपल्या निवेदनात अनेक मागण्या नमूद केल्या आहेत यामध्ये राष्ट्रात वाटत असलेल्या बलात्कार कांडात बलात्कारी साठी सशक्त कठोर न्यायव्यवस्था व कठोर कायदे बनवून दोषींना एका महिन्यात फाशी देण्यात यावी युवती व महिलांच्या बलात्कार प्रकरणी न्यायालयात नित्य सुनावणी जनतेसाठी पोलिसांचे दायित्व व पारदर्शकता तपासण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती बलात्कार प्रकरणात पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधार बलात्कार पीडित साठी मदत महिला व बालकांच्या हत्या अपराध नियंत्रणासाठी निर्भया फंड ची निर्मिती व फास्ट ट्रॅक न्यायालय व्हावे आदींची मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पाठविण्यात आले आहेत.