तेल्हारा(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री घरकूल आवास योजना तेल्हारा नगर परिषद व्दारे शहरा मध्ये राबविण्यात येत आहे. सदर घरकूल योजने मध्ये नगर परिषद ही फक्त शासन व नागरीक यांच्या मधील दुवा म्हणून काम करीत आहे. घरकूल योजनेचा डिपीआर बनविण्या करीता शासनाने केपिएमजी मुंबई या संस्थेची नेमणूक शासनाने शासन स्तरावर केली आहे. केपीएमजी या संस्थेने तेल्हारा नगर परिषद ची परवानगी घेवून शहरातील नागरीकांना आवाहन करुन ऑन लाईन अर्ज मागविण्यात आले. आलेल्या अर्जाचा सर्व्हे हा केपीएमजी या संस्थेच्या कर्मचा-यांनी केला. आता पर्यत या संस्थेने तेल्हारा नगर परिषद कडे 3 डिपीआर सादर केले. त्या पैकी 2 डिपीआर ला शासनाची मान्यता आली. प्रत्यक्षात नागरीकांना घरकूलाचा लाभ देण्या करीता शासनाने नगर परिषद कडे काही अटी व शर्ती तपासण्याची जबाबदारी दिली. शासनाने दिलेल्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे अधिकार नगर परिषद प्रशासनाला नाहीत. कुठल्याही प्रकारच्या जाचक अटी व शर्ती नगर परिषद नागरीकांवर लादत नाहीत.
2 ही डिपीआर मधील एकूण लाभार्थी 556 पैकी नगर परिषद कडे 344 लाभार्थी नागरीकांनी न.प.कडे बांधकाम परवानगी करीता अर्ज सादर केले. शासना कडून न.प.ला रु 222.40 लक्ष रु निधी प्राप्त झाला. प्राप्त निधी नूसार 158 इतक्या लाभार्थ्याना न.प.ने नियमा नुसार बांधकाम परवानग्या दिल्यात त्यापैकी 114 घरकूल लाभार्थ्यानी प्रत्यक्षात बांधकाम सुरु केले. शासना कडून मंजूर झालेल्या डिपीआर मधील सर्वच्या सर्व लाभार्थ्याना न.प.ने बांधकाम परवानगी करीता शासनाने दिलेल्या अटी व शर्ती ची पूर्तता करुन कागदपत्र नकाशा सह बांधकाम परवानगी फाईल मागीतली. नागरीकांना न.प.अध्यक्ष तसेच नगरसेवकांचा कोणताही त्रास देण्यास उद्येश नाही. शहरातील घरकूल योजने मधील लाभार्थ्याचे गूंठेवारी प्रकरण निकाली काढण्या करीता न.प.ने विशेष सर्व साधारण सभा दि 25/2/2020 ठराव सुध्दा केला आहे. त्या ठरावाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी मा.मुख्याधिकारी,तसेच प्रशासनाची आहे. न.प च्या सर्व साधारण सभे मध्ये ब-याच सत्ताधारी विरोधी नगर सेवकांनी मूख्य अधिकारी यांना गूंठेवारी नियमित करण्या करीता प्रखरतेने जाब विचारला. त्यावर मूख्याधिकारी यांनी सभे मध्ये सांगीतले की, मी शासना कडे मार्गदर्शन मागीतले आहे असे सांगीतले. शासनाच्या मार्गदर्शन नुसार नियमा नुसार मी गूंठेवारी प्रकरणे निकाली काढेल.असे मुख्याधिकारी यांनी सर्व नगर सेवकांना सांगीतले. शहरा मधील कोणत्याही नागरीकांला घरकूल संदर्भात अडचण असल्यास नगराध्यक्ष व नगर सेवक, समस्या सोडविण्यास प्रयत्न करतील. आता नगर परिषद निवडणूकीचे दिवस जस जसे जवळ येतील तश्या सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी नगर परिषद मध्ये नागरीकांच्या समस्या सोडविण्यास आक्रमक होतील ही एक चांगली बाब आहे. परंतू आपली राजकीय स्वार्स्था साठी नागरीकांना चुकीचे मार्गदर्शन करुन, भडकवून वेठीस धरु नये. कारण शहरातील जास्तीत जास्त लाभार्थी हे शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. व आता हंगामाचे दिवस आले आहेत. त्यामूळे नागरीकांना त्रास न देता त्यांच्या समस्या सोडवीण्यात याव्यात. आता महाविकास आघाडीने शासन आपल्या राज्यात आहे.घरकूला संदर्भात अटी व शर्ती नियम शिथील करणेचे सर्व अधिकार शासना कडे आहेत. आमचे मार्गदर्शन मा.आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, प्रकाशभाऊ भारसाकळे व विधान परिषद चे आमदार मा.गोपिकिशनजी बाजोरीया साहेब यांचे मार्फत शासना कडे प्रयत्न करीत आहोत. या व्यतिरिक्त शहरातील कोणत्याही राजकीय संघटनेने समोर येवून अटी व शर्ती शिथील करण्यास प्रयत्न करावे. नगर परिषद शासन व प्रशासन सर्वाना सहकार्य करेल. तसेच केन्द्र शासना कडून पूढील अनूदान अजून पर्यत प्राप्त झाले नाहीत. आता पर्यत बांधकाम सुरु असलेल्या लाभार्थ्याना 2 टप्या मध्ये रु 1,40,000/- देण्यात आलेत. उर्वरित 2 टप्याचा निधी शासना कडून प्राप्त झाले नंतरच देण्यात येईल. तरी सर्व लाभार्थ्यानी नोंद घ्यावी.
तसेच शासना कडून उर्वरित निधी उपलब्ध होण्या साठी आम्ही पाठ पूरावा केला आहे व करीत आहोत निधी प्राप्त होण्यास कोविड-19 मूळे विलंब ही होवू शकतो. तरी या बाबतचे राजकारण कोणत्याही राजकीय पुढा-याने करु नये व न.प. मध्ये निवेदने किंवा मोर्चे काढून घरकूल धारकांचा वेळ खर्च करु नये.
आता पर्यतच्या इतीहासात नव्हे एवढा मोठा निधी मा.आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे व आमचे सर्वे सर्व्हे मा.खासदार संजयभाऊ धोत्रे यांचे प्रयत्नाने शासना कडून तेल्हारा नगर परिषद ला खूप मोठा निधी दिला. व न.प.च्या नगराध्यक्षा यांनी कोणताही भोदभाव न करता सर्व प्रभागात निधी वितरण केला. सध्या शहरात सर्वच प्रभागात विकास कामे सुरु आहेत. जास्तीत जास्त कामे ही अंदाजपत्रकीय दरा पेक्षा 15 ते 20 टक्के कमी दराने निविदा न.प.मध्ये प्राप्त झाल्या आहेत सर्व कमी दराच्या निविदा मंजूर करुन काम करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. तसेच निविदा प्रक्रियेत अध्यक्ष व कोणत्याही नगर सेवकांनी हस्तक्षेप केला नाही हे यावरुन सिध्द होत आहे. व न.प.तेल्हारा मध्ये निकोप निविदा प्रक्रिया होते हे यावरुन स्पष्ट होते. न.प.च्या मागील ज्या कामाच्या कार्यकाळात कमीशन राज चालत असेल त्यांना न.प.विकास कामा मध्ये स्वप्नातही कमीशन दिसत असेल. आम्ही निकोप निविदा प्रक्रिया राबवून तेल्हारा न.प.मधून कमीशन राज हद्यपार केले आहे. शेतकरी पॅनल चे नगर सेवकांचा नगराध्यक्षां वर विश्वास आहे. आम्ही विकासात्मक धोरण ठेवून श्रेष्ठीचे आदेशावरुन न.प.चा पूर्ण कार्यकाळ भा.ज.पा.सोबतच पूर्ण करु व घरकूल योजनेतील नागरीकांना कूठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हयांची आम्ही ग्याही देतो. इंदिरा आवास मधील नागरीकांना हक्काचे घर मिळावे म्हणून शासकीय जागेवरिल अतिक्रमण नियमित करणे बाबत 462 प्रकरणे तयार केली असून भूमि अभिलेख कार्यालया कडून 432 अतिक्रमणाची मोजणी नुकतीच पूर्ण झाली असून मोजणीशिट प्राप्त झाले नंतर मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांचे कडे प्रस्ताव सादर करयात येईल. आम्ही सर्वच इंदिरा आवास मधील नागरीकांना घरकूल मिळावे यासाठी सर्वतो प्रयत्न करु पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा च्या वतीने माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश रमेश खारोडे यांनी संबोधिले पत्रकार परिषद ला न प उपाध्यक्षा सौ मालुताई सुभाष खाडे गटनेते श्री नरेश आपा गंभीरे गटनेते श्री प्रतापराव देशमुख नगर सेवक सौ नालुताई तायडे सौ दुर्गताई भटकर श्री मंगेश सोळंके ओम भाऊ सुईवाल गाणी शाहा सर व गजानन गायकवाड दिलीप पिवाल मुकेश अासरे सचिन तायडे हे हजर होते