अकोला – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2011-12 आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा योजना मंजूर असून त्याअनुषंगाने वैयक्तीक स्वरुपात छोट्या नद्या, नाले व तलावात मासेमारी करुन आपली जिवीका चालविण्यासाठी अर्थाजन करीत असणाऱ्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या योजनाकरीता आधारकार्ड, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैयक्तीक स्वरुपात छोट्या नद्या, तलावात मासेमारी करुन आपली जिवीका चालवित असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व पासपोर्ट साईज फोटो या आवश्यक कागदपत्रांसह 9 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावे. या दस्तऐवजांसह 9 ऑक्टोंबर पर्यंत वैयक्तीक स्वरुपात छोट्या नद्या, नाले व तलावात मासेमारी करुन आपली उपजिविका स्वत:उपस्थित राहून कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा. जेष्ठतेनुसार व जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थी निवड करण्यात येणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.