अकोट(देवानंद खिरकर)- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात आज पुरवठा विभागात गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी भाजप पदाधिकऱ्यांनी पुरवठा विभागातील गोडाऊनला भेट दिली.अकोट तालुक्यामध्ये पुरवठा विभागामार्फत अतिशय निकृष्ट दर्जाची तुर दांळ वितरित करण्यात आली आहे. जनावर सुद्धा तूर दाळ खाऊन बिमार पडतील अशी तुरदाळ गोरगरीब जनतेच्या पोटात घालून त्यांना मरणाच्या दारात लोटत असलेले शासन व त्याचे अधिकारी जीवाशी खेळत आहेत.उमेश पवार,प्रवीण डिक्कर, यांनी गोडाऊन मधे पाहणी केली असता चांगल्या प्रतीची दांळ ऊपलब्ध आढळुन आली आहे.मात्र असे कोरोनाचे संकट असताना जनतेच्या आरोग्याला हानिकारक असणारी निकृष्ट दर्जाचे तूर डाळ का वितरित केली.असा जाब अनुसूचित जमाती चे जिल्हा अध्येक्ष उमेश पवार युवा मोर्चा जिल्हा सरचिटीस प्रविण डिक्कर यांनी पुरवठा अधीक्षक चव्हाण तसेच गोडाऊन व्यवस्थापक चांदेकर यांना जाब विचारला आहे. सदर घटनेचा निषेध म्हणून अधिकाऱ्यां समोर निकृष्ट दर्जाचे दाळ डूकरांना खाऊ घातली आहे.खराब दाळ परत बोलावून चागली प्रतीची डाळ नागरिकांना 8 दिवसाच्या आत वितरीत न केल्यास अधिकाऱ्यांना त्या डाळ तहसील कार्यालयात मधे शिजवुन घाऊ घालण्यात येणार आहे. असे आदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी उपस्थित उमेश पवार (जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा )प्रविण डिक्कर जिल्हा सरचटणीस युवा मोर्चा विक्रम सोलकर,तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती,गोपाल मोहोड,ता अध्यक्ष युवा मोर्चा,निखिल टावरी, विठ्ठल डोबाळे,निवृत्ती गडम सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष ,मंगेश ताडे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, दिलीप सुलताने शेतकरी आघाडी,अक्षय वसू जिल्हा सचिव,अजय खडसान ता उपाध्यक्ष, गणेश रेळे सर्कल प्रमुख, ज्ञानेश्वर मोडक , ज्ञानेश्वर आढे,श्रीकांत गाडेकर,देवा भारसाकले ,किशोर देवगीरे,कोलटक्के अकोला पूर्व प्रसिध्दी प्रमुख उपस्थित होते.