मुंबई :
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला. याला भाजपने जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य काही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत अवमान केला, असा दावा करत विशेषाधिकारी भंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध म.वि.स नियम २७३ अन्वये विशेषाधिकारभंग व अवमानार्थ सूचना दाखल करण्यात आली आहे. ती सभागृहात मांडण्यात अनुमती द्यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.