पातूर (सुनिल गाडगे):- आलेगांव ग्राम पांचायत कार्यालया मधून नमुन आठचे रजिस्टर चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली.सदर रजिस्टर चोरी बाबत ग्रामपंचायत उपसरपंच श हणाजबी यांनी चांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेली आलेगांव ग्राम पंचायत तालुक्यामध्ये सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखले जाते.सदर ग्राम पंचायत कार्यालया मधून नमुना आठचे रजिस्टर चोरी गेल्याचे पोलिसांमध्ये तक्रार कर्त्या उपसरपंच यांना ग्राम पंचायत कर्मचारी नागेश मोहाडे यांनी फोन केला की ग्राम पंचायत कार्यालया मधून
नमुना आठचे रजिस्टर चोरीला गेले त्या नुसार त्याचे कडून सविस्तर माहिती घेतली असता दि ७ सप्टेंबर रोजी नागेश मोहाडे ग्राम पंचायत कार्यालयामध्ये दैनंदिन काम करीत असताना इमरानखान मुमताज खान व मजहर भाई हे दोघे जण आले होते.त्या वेळी ग्राम पंचायत सदस्य पती गणेश ढोणे यांचा कर्मचारी नागेश मोहाडे याला फोन आला की तूझ्या सोबत काम आहे तू कार्यालयामधून खाली ये त्यावेळी ग्राम पंचायत मध्ये बसून असलेल्या दोन व्यक्तींनी सदर रजिस्टर गहाळ केले.व आज त्यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही तसेच ग्रामसेवक नंदकिशोर साळुंखे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की नागेश तू रिपोर्ट देऊ नको मी त्यांच्या कडून रजिस्टर आणून देतो मला त्यांचा फोन आला होता.रजिस्टर त्यांच्या कडे आहे.तरी महोदय अशा ग्रामपंचायत मधून रजिस्टर ग्रा पं ची मालमत्ता चोरून नेणाऱ्या व शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर योग्य तो तपास करून सदर रजिस्टर ताब्यात घेऊन या सर्वांची चौकशी करून त्यांचेवर फोजदारी कार्यवाही करावी असे ग्रा पं उपसरपंच शहनाजबी शे कालू यांनी दिलेल्या पोलीस तक्रारी मध्ये नमूद आहे.