मूर्तिजापूर (सुमित सोनोने)-कोरोना या आजारावर अजूनही १०० टक्के प्रभावी औषध किंवा लस उपलब्ध नसून आपली प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी चांगली असल्यास आजार होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जग भरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे.
याच धरतीवर आपली प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याच्या दृष्टीने आयुर्वेद इम्युनिटी संकल्पना समोर आली कोरणा वर मात करण्यासाठी डॉक्टरांनी निमा संघटना पुढाकार घेत असून इम्युनिटी ची संकल्पना राबवत आहे कोविड 19 आयुष टास्क फोर्स महाराष्ट्र शासन व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्व संमतीने राज्यात इम्युनिटी क्लिनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुभेच्छा दिल्यानंतर सुरू होत आहे. मुर्तीजापुर येथे जुनी वस्ती डॉक्टर सुजाता मुलमुले यांचे रुग्णालयात आमदार हरीश पिंपळे यांचे हस्ते नगराध्यक्षा मोनाली गावंडे माझी अध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे प्राचार्य विकास सावरकर प्राध्यापक दीपक जोशी यांचे उपस्थितीत इम्युनिटी क्लिनिकचे उद्घाटन झाले यावेळी सुधीर दुबे डॉक्टर सुधीर मुलमुले प्रभाकर कवठेकर राहुल मुलमुले यांची ची उपस्थिती होती.