आडगाव(प्रतिनिधी)- आज ०२ सप्टेंबर रोजी मौजे आडगाव ( रित प्रगणे ) शेतशिवारातील सुरेश माणिक शेंडे यांचे शेत गट क्र :-१३ मौजे आडगाव (रित प्र .) मध्ये वन्यप्राणी अजगर प्रजातीचा साप वनविभाचे कर्मचारी व सर्पमित्र यांनी सदर अजगर यास पकडुन मा .पशुधन विकास अधिकारी अकोट यांचे मार्फत प्राथमिक उपचार करून सदर अजगरास ( लांबी:-१२ फुट २ईंच जाडी:40 सेंमी वजन::-33 किलो) मेळघाट वाघ्र प्रकल्पाच्या जंगल क्षेत्रात सोडण्यात आले . सदर कार्यवाही अजय .एन. बावणे वनपरिमंडळ अधिकारी अकोट ( प्रादे) वर्तुळ , डी. ए . सुरजुसे वनरक्षक बोर्डी बीट, जी.पी. घुडे वि.सेवा अकोट, एस.जी. जोंधळे वनरक्षक शहानुर बीट व अकोट वनकर्मचारी तसेच सर्पमित्र मंगेश गंगतिरे व
सागर कस्तुरे यांनी केली.