तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेश विसर्जन हे घरी अथवा गणेश घाटांमध्ये करण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र तेल्हारा पालिकेकडून कुठेही कृत्रिम घाट तयार करण्यात आला नव्हता त्यामुळे शहरातील गणेश भक्तांसमोर गणेश विसर्जन कुठे करावे असा प्रश्न उपस्थित झाला होता या बाबीची दखल घेत अवर अकोला न्यूज ने “कोरोना काळात गणपती विसर्जनासाठी तेल्हारा पालिकेकडून उपयोजनेचा विसर”या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच पालिका प्रशासनाला जाग येऊन रातोरात स्थानिक सायली गार्डन येथे गणेश घाट तयार करण्यात आला.त्यामुळे गणेश भक्तांसमोर उभा राहलेला प्रश्न मिटला.शहरातील गणेश भक्तानी गणेश घाटातच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन पालिकेकडुन करण्यात आले आहे,