मूर्तिजापूर(सुमित सोनोने)-धुळे येथील अभाविप च्या कार्यकर्त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा विरोध आज भाजयुमो मूर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे करण्यात आला विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसाठी संविधानिक रित्या निवेदन देण्या करता गेलेल्या विद्यार्थ्यांना माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक देणाऱ्या राज्यमंत्री व धुळे जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी निवेदन देऊन करण्यात आली आणि विद्यार्थी हिताचा विचार न करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोलभाऊ पिंपळे, भाजयुमो जिल्हा सचिव चेतन सदार,लकीभाऊ अग्रवाल,भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पूभाऊ मुळे,युवा मोर्चा मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षलभाऊ साबळे,भाजप तालुका अध्यक्ष भूषणभाऊ कोकाटे,भाजप शहर अध्यक्ष रितेशभाऊ सबाजकर,
कमलाकरभाऊ गावंडे,अमितभाऊ नागवान,नुपेन अरोरा,राणा सोळंके,आशिष गुंजाळ,आशिष गुंजाळ,हर्षल लोहिकपूरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष कुणाल ठाकूर,विलास साळवे,अभाविपचे नगरमंत्री प्रसाद धारपवार शुभम अवताडे प्रणव फुलझुले,राजेंद्र इंगोले, दिवाकर सोनोने, राहुल गुल्हाने व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.