मुर्तिजापूर(सुमित सोनोने)-विश्व हिन्दू परिषद,बजरंग दल विदर्भ प्रांत द्वारे महाराष्ट्रातील बंद असलेल्या सर्व मठ, मंदिर, देवस्थान उघडण्या करिता संपूर्ण विदर्भातील जिल्हा वह प्रखंड स्थानी”घंटानाद,शंखनाद,आंदोलन करण्यात आले आहे.
त्यास अनुसरुन मुर्तिजापुर प्रखंडातिल व शहरातिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी व धर्मप्रेमी बांधवानी श्री बालाजी मंदिर,श्रीराम मंदिर जुनी वस्ती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शारिरीक अंतर पाळुन व मास्क लावुन आंदोलन केले.व उपविभागीय दंडाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विहिपचे जिल्हा सहमंत्री मंगेश अंबाडेकर,प्रखंड मंत्री श्याम देवगिरकर, बजरंग दल संयोजक आशीष झाला,सहसंयोजक आनंद बांगड,प्रसार प्रचार प्रमुख मोहित अग्रवाल,शहर संयोजक रोहित श्रीवास,शहर सहसंयोजक अक्षय सुखचैन,साप्ताहिक मिलन प्रमुख निर्मल मेहता,महाविद्यालयीन प्रमुख नितिन काकडे,व बजरंग दल कार्यकर्ता अंकित तिवारी, हर्षल साबळे आदी उपस्थित होते.