• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला ; प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 30, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
ई-पास
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अनलॉक ३ ची मुदत उद्या संपत असल्याने गृह मंत्रालयाने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार लॉकडाऊन येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आला आहे.प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.तर राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

केंद्र सरकारने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अधिक व्यवहार खुले केले आहेत.तर प्रतिबंधित क्षेत्रात ३० सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.मेट्रो रेल्वे सेवा येत्या ७ सप्टेंबर पासून श्रेणीबद्ध पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली जाणार आहे.२१ सप्टेंबर पासून सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा,करमणूक ,सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर स्नेहसंमेलनाला १०० जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी दिली जाईल.अशा मर्यादित संख्येच्या कार्यक्रमांमध्ये देखील फेस मास्क घालणे,शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझर व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

२१ सप्टेंबर पासून खुल्या प्रेक्षगृहांना (ओपन एअर थिएटरला) उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे.मात्र शाळा,महाविद्यालये,शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाईन,दूरस्थ शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. राज्ये,केंद्र शासित प्रदेश ५० टक्के पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचा-यांना एकाच वेळी ऑनलाईन शिकवणी,दूरध्वनी-सल्लामसलत आणि संबंधित कामांसाठी शाळांमध्ये बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे.केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याकरिता त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे.राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.

खालील बाबींशिवाय,इतर कृतींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर परवानगी देण्यात आली आहे:

सिनेमागृहे,तरण तलाव,मनोरंजन पार्कस,थिएटर्स (खुले थिएटर सोडून) आणि यासारखी ठिकाणे.आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रवास, केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेली असेल तर.टाळेबंदी सुरु असून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये याचे ३० सप्टेंबर पर्यंत काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.राज्य,केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर, केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही स्थानिक टाळेबंदी (राज्य,जिल्हा,उप-विभाग,शहर, गाव पातळीवर) लागू करता येणार नाही.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य वाहतुकीवर निर्बंध नाहीत.राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्ती आणि मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशा प्रकारच्या वाहतुकीसाठी कसल्याही विशेष परवानगी,मंजूरी,ई-परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

Tags: अनलॉक ३ई- पासलॉकडाऊन
Previous Post

हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘चोर मचाए शोर’ चोरीच्या घटना अन चोरट्यांचा बोलबाला

Next Post

मोठा निर्णय : विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
परीक्षा

मोठा निर्णय : विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही

पिक

वंचितच्या मागणीला यश,सर्व खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचा कृषी उपसचिवाचा आदेश.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.