आमदार नितीन बापू देशमुख यांची भेट व मदतीचे आश्वसन
वाडेगाव(डॉ चांद शेख)- बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या मौजा वाडेगाव मध्ये महात्मा फुले चौकात असलेल्या निर्गुणा नदीच्या काठावर असलेल्या घराची भिंतीसह घर कोसळून संसार उघड्यावर आल्याची घटना बुधवार रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.
यामध्ये कुटूंबातील सदस्याचे थोडक्यात प्राण वाचले असून कुटूंब सुखरूप आहे. हे घर माणिकराव इंद्रभान चिंचोळकर
वय ५५ वर्ष यांचे असून धंदा म्हणुन शेतमजुरी करतात
यांचे राहते घर नदीच्या काठावर असल्याने भिंतीसह घर, स्वयंपाक घर,संडास बाथरूम कोसळुन घरातील धान्यसह दिड लाखांपर्यंत पर्यतचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेची माहीती माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनंता रामराव काळे, दत्तात्रय लोखंडे, गणेश धनोकार, विवेक हुसे, रवी हुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहीती घेऊन तलाठी व कोतवाल यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. घडलेल्या घटनेचा त्वरीत पंचनामा करून शासनाकडुन नैसर्गिक आपत्ती फंडामधुन मदत जाहीर करावी व त्वरीत नुसकानग्रस्तच्या बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी पं स सदस्या रुपाली अनंता काळे व सामाजिक कार्यकर्ते अनंता रामराव काळे यांनी केली आहे. तलाठी एस एन ताथोड व कोतवाल नारायण घाटोळ, नारायण मानकर यांनी घटनेची पहाणी करून घटनेचा पंचनामा केला.