कोरोनाचा काळ अन रस्त्यावर अकोलेकरांनी ये जा सुरू अशातच दुपारी १२.३० वाजताची वेळ…अन अकोल्यातील आकाशवाणी केंद्रामध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलिस आकाशवाणी केंद्राला घेराव घालतात…आणि पोलिस कार्यालयात अतिरेक्यांना ठार करतात. काही मिनिटात घडलेल्या या घडामोडींमुळे घाबरून, गोधळून गेलेल्या परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहून आपला जीव मुठीत धरून बसले होते.
गणेशोत्सवाच्या आणि मोहोरम च्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने गुरुवारी दुपारच्या सुमारास सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन समोरील आकाशवाणी केंद्रात मॉकड्रील आयोजित केला होता. अकोला आकाशवाणी केंद्रात अतिरेकी घुसले आहेत. या अतिरेकांनी संपूर्ण आकाशवाणी केंद्र हॉयजॅक केली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, अॅम्बुलन्स, शिघ्रकृतीदल, बॉम्बशोधक व नाशक पथकास ही माहिती देण्यात आली. काही वेळात शहराचे पोलिस अधीक्षक जी श्रीधर, एसडीपीओ सचिन कदम पोलिस स्टेशनचे अधिकारी व इतर यंत्रणा त्वरित आकाशवाणी केंद्रा समोर आली.
अतिरेकी असलेल्या आकाशवाणी चा परिसर पोलिसांनी दोरी लावून निर्मनुष्य केला. संपूर्ण घटना पाहताना परिसरातील समस्त नागरिक मध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यातच पोलिसांनी आपली पोजिशन घेतली. एक-एक करून चार अतिरेक्यांना आत शिरलेल्या अतिरेक्यांना ठार करण्यात आले. हा सर्वप्रकार होईपर्यंत परिसरात असलेल्या नागरिकांना काहीच समजेनासे झाले. मॉकड्रील पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून नागरिकांना मॉकड्रील असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तब्बल अर्धातास हे मॉकड्रील सुरू होते. अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीकांत यांनी जर अकोला जिल्ह्यात कुठे आतंकवादी हल्ला झाला तर अकोला पोलीस या हल्याला चोख उत्तर देण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले.