पातुर(सुनिल गाडगे):
..स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला.
यामध्ये व्ही जी.तायडे ,ए. जी. शेलुडकर ,के. एच राठोड यांचा सपत्नीक सत्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन बेरार एज्युकेशन सोसायटी’च्या सचिव सौ. स्नेहप्रभादेवी गहिलोत सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंचावर अध्यक्षा म्हणून स्नेहप्रभादेवी गहिलोत तर
प्रमुख पाहुणे बेरार एज्युकेशन सोसायटी चे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत ,मुख्याध्यापक
बी एम वानखडे बाभूळ गाव शाळेचे मुख्याध्यापक सीताराम श्रीनाथ , उपप्राचार्य एस बी ठाकरे जी. एस.तारापुरे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना तिनही सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थे प्रति कृतज्ञता व्यक्त केली व भविष्यातील संस्थेला कुठल्याही प्रकारे गरज भासल्यास सहकार्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी शेलुडकर सर यांचे कडून विद्यार्थ्यांसाठी विविध बक्षिसांची घोषणा करण्यात आली.
तर प्रामाणिक शिक्षक मुळे संस्थेचे नाव होते असे विचार संस्थेच्या सचिव सौ. स्नेहाप्रभादेवी गहिलोत यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एम. वानखडे सर यांनी केले. सूत्रसंचालन एस.एस.इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन एस.एस.डोंगरे यांनी केले.