कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१९६
पॉझिटीव्ह- १६
निगेटीव्ह- १८०
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील रिधोरा बाळापूर येथील सहा जण, दहिगाव गावंडे येथील चार जण, गड्डम प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिद्धार्थनगर, जूने शहर येथील ७४ वर्षीय पुरुष असून तो दि. १३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २७४३+५३२=३२७५
मयत-१३७, डिस्चार्ज- २६९५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४३
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!