म्हेसांग(निखिल देशमुख)-रस्त्यावरील पूल योग्य पध्दतीने न बांधल्याने मजलापूर येथे घरात पाणी घुसल्याने अनेकांच्या संसारपयोगी सामानाचे नुकसान झाले आहे.सदर पूल कोणत्या उद्देश्याने लहान पुलाचे बांधकाम केले असावे असा प्रश्न लोकांना पडला आहे. रस्ता मोठा पूल लहान ही बाब पंचायत समिती सदस्य आनंद डोंगरे व ग्रामपंचायत सदस्य सुषमा काळे प्रज्ञा डोंगरे शेख मुस्ताक यांनी ग्रामसेवक अहिर आणि इंजिनियर राठोड यांच्या लक्षात आणून सुद्धा त्यांनी या पुलाकडे लक्ष न दिल्यामुळे आक्रोश निर्माण होत आहे शेतामधून मोठया प्रमाणात या नाल्यात पाणी येते व ये जा करणारांचे मोठे हाल होतात हा पूल झाला पण अर्धवट मजलापूर जलालाबाद येथील हा मुख्य रस्ता असून तिथं अरुंद पूल का बांधण्यात आला.असा प्रश्न घरात पाणी घुसल्यामुळे होत आहे हा अरुंद पूल मोठा करण्यात यावा अशी मांगणी होत आहे.