तेल्हारा(प्रतिनिधी)- संपूर्ण देशात सुरू असलेल्या कोरोना या महामारीमुळे अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंसिंग पालन करत सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष श्री.विलासराव जोशी यांच्या हस्ते श्री.शिवाजी महाराज पुतळ्याचे हारार्पण करून पूजन करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष श्री बेनीप्रसादजी झुनझुनवाला यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व भारत मातेला वंदन करून भारत माता की जय जयघोष करण्यात आल्या. प्रथमच सर्व शाळा बंद असल्यामुळे इतिहासात मुले व मुली यांच्या विना झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.