अकोला – राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मागण्या करूनही त्या पूर्ण न झाल्याने येत्या १७ ऑगस्ट रोजी सफाई कामगार व पालिका कर्मचाऱ्यांचा सफाई कामगारांच्या मागण्यासाठी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
राज्यातील सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांच्या सोबत रामगिरी नागपूर येथे दिनांक ७ मार्च २०१९ रोजी आमदार व संबंधित अधिकारी तसेच समाजाचे सदस्य यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी मान्यता दिल्याप्रमाणे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिनांक २९ जून 2020 ला मिनिट्स काढून संबंधित विभाग विभाग प्रमुखांना कळवले होते पण अद्याप पर्यंत शासनाच्या वतीने कोणती प्रश्न निकाली काढण्यात आले नाही तसेच या बाबत दिनांक 16 जुलै 2020 रोजी आमच्या संघटनेच्या वतीने स्मरण पत्र देऊन प्रश्नाकडे शासनाने लक्ष केंद्रित करण्यास्तव दिनांक 24 जुलै 2020 रोजी राज्यव्यापी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून मा जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मान याचे निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु सफाई कामगारांच्या प्रश्नाकडे शासनाची उदासीनता लक्षात घेऊन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने नपास सर्व कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे करिता दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित एक दिवसीय काम बंद आंदोलनात कोविड१९ नियमांच्या अधीनस्थ राहून सहभाग असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री जयसिंग कचछवाह कार्याध्यक्ष श्री अनुप खरारे महामंत्री श्री पि बी भातकुले प्रदेश संघटक श्री श्यामजी पिवाल सर तेल्हारा शाखा अध्यक्ष सागर सारवान प्रमुख सल्लागार श्री श्यामलाल जी बघ्घन श्री ईश्वर जी सारवान यांनी पत्रक काढून कळविले आहे