अकोला – राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्या पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीने आज ‘डफली बजाव’ आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी या आंदोलनात सहभाग घेत सरकारचा निषेध नोंदवला.अकोल्यासह जिल्हयातील अनेक ब भागात डफली बजाव आंदोलनाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे.
राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक व्यवहार सुरू झाले असले तरी, जिल्हाबंदी कायम आहे. टाळेबंदीमुळे फेरीवाले, डेकोरेशन, नाभिक, चर्मकार यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. टाळेबंदीचा फटका बसलेल्या या सर्वांना सरकारकडून मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून आदोंलन पुकरण्यात आले होते. आंदोलकांनी डफली बजाओ आंदोलनातर्फे आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.अकोला जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तसेच अनेक गावांमध्ये डफली बजाओ आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत महाविकास आघाडी सरकार यावर काही तोडगा कढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.