पातूर (सुनिल गाडगे) : अयोध्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पातूर शहरात संस्कार भारतीच्या वतीने श्रीरामाची आकर्षक भव्य रांगोळी काढण्यात आली.
श्री राम जन्मभूमी अयोध्या नगरीत दि 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त संस्कार भारतीच्या वतीने दारात आकर्षित रांगोळी काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील निवडक रांगोळ्या अयोध्या नगरीत पाठविण्यात येणार आहेत. या आवाहनानुसार पातूर शाखेच्या संस्कार भारतीच्या वतीने श्री रामाची आकर्षक रांगोळी काढण्यात आली. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सुलभा परमाळे यांनी ही आकर्षक रांगोळी रेखाटली आहे. यावेळी संस्कार भारती चे अध्यक्ष प्रा. विलास राऊत व किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी मार्गदर्शन केले. कोरोनारूपी रावणाचा श्रीराम बाण मरून वध करीत असल्याची रांगोळी रेखाटण्यात आली आहे. ही रांगोळी पातूर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.