मुंबई : महावितरण मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरण मध्ये मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे या जागांची भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.मात्र राज्यात सध्या देण्यात आलेल्या शिथीलतेनंतर महावितरण मध्ये केंद्र सहाय्यकाच्या २ हजार तर विद्युत सहाय्यकाच्या ५ हजार जागा भरण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. लॉकडाऊनमुळे ही भरती लांबणीवर पडली होती.पण शेवट गोड होत आहे ! जय महाराष्ट्र असे ट्विट राऊत यांनी केले आहे.