कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- १८४
पॉझिटीव्ह- ३६
निगेटीव्ह- १४८
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २० महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील दाळंबी येथील नऊ जण, विठ्ठल नगर मोठी उमरी येथील पाच जण, बोरगाव मंजू व वाडेगाव येथील प्रत्येकी तीन, अकोट, डाबकी रोड व आगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित मुर्तिजापूर, संताजी नगर, बार्शीटाकळी, रिधोरा, दहिहांडा, शिवर, संकल्प कॉलनी, कोठारी, केशव नगर व अग्रसेन भवन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३७५+४१६=२७९१
मयत-११३, डिस्चार्ज- २२४३
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह- ४३५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!