• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटने आल्याची अकोट खंडवा रेल्वे मार्गाची परिस्थिती!दोन राज्य जोडणारा सर्वात महत्वाचा रेल्वे संपर्क अनेक वर्षांपासून खंडित

Media Desk by Media Desk
July 31, 2020
in Featured, अकोला जिल्हा, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
79 1
0
रेल्वेमार्ग
14
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (प्रतिनिधी)- बहुप्रतिक्षित अकोला- खंडवा- इंदौर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पैकी अकोट ते अकोला मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले. परंतु महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या अकोट- हिवरखेड- आमलाखुर्द या रेल्वे मार्गाचे काम रखडल्याने लाखो प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. हा मार्ग मेळघाट मधूनच न्यावा किंवा मेळघाटच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडून बुलढाणा जिल्ह्यातून न्यावा या मागणीला धरून दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याला आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे राजकीय स्वरूप आल्याचेही बोलल्या जात आहे. ह्या आत बाहेरच्या ओढातानीत सामान्य रेल्वे प्रवासी पुरते भरडले जात असून मागील साडे तीन वर्षांपासून मीटर गेज रेल्वे सुद्धा बंद झाल्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश रेल्वे संपर्क तुटलेला असल्याने प्रवाशांची स्थिती मात्र “तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले” अशी झाली आहे. प्रवाशांना हजारो रूपयांचा भुर्दंड पडत असून व्यापाऱ्यांचे लाखो करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत आत बाहेरचा निर्णय होत नाही. तोपर्यंत अकोट ते मध्यप्रदेश अशी मीटरगेज रेल्वे का सुरू ठेवली नाही? असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत.

प्रतिक्रिया:-
आपसी द्वंद आणि ओढताढ थांबवुन आतला किंवा बाहेरचा कोणताही मार्ग निवडा पण काम तात्काळ सुरु करून हा प्रकल्प पूर्ण करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा केल्यास ह्या मार्गावर तात्काळ तोडगा निघू शकतो.
धिरज बजाज, सामाजिक कार्यकर्ता, हिवरखेड

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वेगळा बॉक्स 1
समर्थक आणि तर्क
मार्ग मेळघाट मधूनच नेण्यासाठी भाजपा प्रणित केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, संजय धोत्रे, दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी, खासदार नवनीत राणा, आ. राजकुमार पटेल, अमरावती जिल्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी, यांच्यासह अनेक मान्यवर इच्छुक असल्याचे दिसते.
तर्क
सर्वात जुना आणि जवळचा मार्ग आहे.
आधीपासूनच मार्ग अस्तित्वात असल्याने वनकायद्याचा अडसर नसावा.
धुळघाट येथील ४ चा आकडा विशेष आकर्षण आहे.
काम लवकर पूर्ण होईल.
काम कमी खर्चात पूर्ण होईल.
भूमी अधिग्रहणाची आवश्यकता राहणार नाही.
वेळ, श्रम पैसा वाचेल.
आदिवासी बांधवांच्या उन्नतीचा मार्ग आहे.
आतापर्यंत वन्यजीव हानी झाली नाही.

वेगळा बॉक्स 2
पर्यायी मार्गाचे समर्थक व तर्क
सुप्रीम कोर्टाची सेंट्रल इम्पॉवर्ड कमिटी CEC, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीचे महाराष्ट्र सरकार, वनविभाग, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ NBWL, नॅशनल टायगर कंझरवेशन अथोरिटी NTCA, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WII, पर्यावरण व वन्यजीव प्रेमी, बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विधिज्ञ मनीष जेसवानी, जयंत वडतकर, निसर्ग कट्टा, अमोल सावंत, स्वप्नील देशमुख, श्याम आकोटकर, हिवरखेडची ग्रामसभा, अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक यांच्यासह अनेक संस्था मेळघाट ऐवजी मार्ग बाहेरून न्यावा अशी पक्षधर असल्याचे दिसते.
तर्क
मेळघाटातील वाघांचे अधिवास सुरक्षित राहील
वन्यजीव व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.
जैव विविधता, व जंगलांचे संरक्षण व संवर्धनात अडचण येणार नाही.
पर्यायी मार्गाने 2 लाख प्रवाश्यांना फायदा
तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांसाठी वरदान ठरेल.
विकासाला चालना मिळून लाखो लोकांचे जीवनमान सुधारेल.
असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
रेल्वे द्रुतगतीने धावेल.
पर्यायी मार्गासाठी राज्यसरकार 700 कोटी देण्यास तयार असल्याची चर्चा.

Tags: अकोट खंडवा रेल्वे
Previous Post

जिल्ह्यात आज ५ रुग्णांची भर रॅपिट टेस्ट मध्ये २९ जण पॉझिटिव्ह,आकडा २६१३ पार

Next Post

10 वी 12 वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण, सेवा व रोजगार संधी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला चा उपक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
career

10 वी 12 वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण, सेवा व रोजगार संधी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला चा उपक्रम

अण्णाभाऊ साठें

अण्णाभाऊ साठेंची लेखणी, ही मुक्या वंचितांचा हुंकार-भिमराव परघरमोल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.