अकोला– साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळला सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालयाकडुन अनुदान योजनेतर्गत 200 व बिज भांडवल योजनेअंतर्गत चारचे उद्दीष्टे प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील ज्या अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त व 50 वर्षापेक्षा कमी आहे. तसेच यापुर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही. अशा अर्जदारास अनुदान व बीजभांडवल योजनेअंतर्गंत कर्ज मागणी अर्जाचे वाटप जिल्हा कार्यालयात चालू आहे. गरजु लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दोन फोटो, घर टॅक्स पावती किंवा नमुना आठ, व्यवसायासंबंधी कोटेशन, प्रकल्प अहवाल तसेच व्यवसायसंबंधी प्रमाणपत्रासह कर्ज मागणी अर्ज भरुन जमा करुन घेण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, आरोग्य नगर चौक, नालंदा नगरच्या बोर्डाजवळ, कौलखेड रोड, अकोला, येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गंगाधर श्रीरामवार यांनी केले आहे.