वाडेगाव (डॉ चांद शेख)- गावात कोणतीही सोयी सुविधा नाही.शिक्षणाचा वाससा नाही. अश्या निरक्षर असलेल्या बल्लाडी गावातील दुसऱ्या फळीतील मुलांनी शिक्षनाची कास धरली ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर जिद्द व चिकाटीच्या बळावर प्रविण्य प्राप्त करीत आपल्या गावाचे नाव उज्वल देखिल केले आहे.
बाळापूर तालुक्यातील एकमेव भटक्या जमातीचे बल्लाडी हे ५५० लोक वस्तीचे छोट्याशे गाव आहे. इयत्ता ५ वी पर्यतची शाळा सोडली तर इतर सुविधे पासुन कायम वंचित असलेल्या या गावातील नागरीकांचा जंगलातुन चारा आनुन म्हशीचे पालन पोषण करने व त्यामधुन मिळणाऱ्या दोन पैश्याच्या उत्पनातुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविने हा मुख्य व्यवसाय आहे. जगाशी संपर्क नसलेल्या या गावातील लोक फारशे शिकलेले नाहीत.मुलांनी शिक्षण घेऊन मोठं व्हाव हे प्रत्येकांच्या आई वडीलांची ईच्छा असते. त्यामुळे या गावातील अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडले.मात्र आजही अनेक कुटुंब आपले घर व व्यवसायासाठी गावातच आहेत.या गावातील विद्यार्थी हाल अपेष्टा सहन करीत रस्ता तुडवत वाडेगाव येथुन अपडावुन करुन शिक्षण घेत आहेत.तर काही विध्यार्थी अकोला येथे जावुन उच्च शिक्षण घेत आहेत.त्यापैकी पोलीस पाटील चंद्रभान शिंदे यांचा पुतण्या जय अशोक शिंदे या विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी सायन्स शाखेला अकोल्याच्या एल आर टी काॅलेज मधुन ९४,४६ टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन करीत आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे. गुरुवारी बाळापुरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी त्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.