कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.२० जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१९
पॉझिटीव्ह- पाच
निगेटीव्ह- १४
अतिरिक्त माहिती
आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत. ते अकोला शहरातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वार्टर, खेतान नगर, जीएमसी या भागातील रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून एक ६० वर्षीय इसम गुलजार पुरा येथील तर अन्य एक ५५ वर्षीय इसम लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. हे दोघे दि.११ रोजी दाखल झाले होते.
काल रात्री रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचा आजच्या पॉझिटिव्ह अहवाल व दाखल रुग्ण संख्येत समावेश आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०१९+१२१=२१४०
मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७२९
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३०७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!