• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 19, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

229 अहवाल प्राप्त; आठ पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज, दोन मयत

Media Desk by Media Desk
July 18, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
चाचणी
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.18-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 229 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 221 अहवाल निगेटीव्ह तर  आठ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2065(1967+98) झाली आहे. आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले,असून आता 282 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 16327 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 15849, फेरतपासणीचे 161 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 317  नमुने होते. आजपर्यंत एकूण 16282 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 14315 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2065 (1967+98) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज आठ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आठ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात चार  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चारही पुरुष आहेत. त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता. अकोट येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

काल रात्री(दि.17) रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांची संख्या आतापर्यंत 98 झाली आहे.त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर  कोविड केअर सेंटर मधून 10, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून त्यातील एक 76 वर्षीय तर अन्य 54 वर्षीय आहे. हे दोघे जण अकोट येथील रहिवासी आहेत. ते दि.10 रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

282 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2065 (1967+98) आहे. त्यातील 101 जण (एक आत्महत्या व 100 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1682 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 282 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 580 चाचण्या, 22 पॉझिटिव्ह

Next Post

जिल्ह्यात आज पाच जण पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola corona updates

जिल्ह्यात आज पाच जण पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

सोशल ऑडिट

कोरोना काळातील ‘नरेगा’चे ‘सोशल ऑडिट’!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.