अकोला,दि.18- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 580 चाचण्यामध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे अकोला मनपा हद्दीत 25 चाचण्या झाल्या त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले. अकोला ग्रामीण मध्ये 120 चाचण्या होऊन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे 58 चाचण्या होऊन त्यात नऊ जण पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 78 जणांच्या होवून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे 197 चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. बार्शीटाकळी येथे 27 चाचण्या झाल्या त्यात आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर मुर्तिजापुर येथे 75 जणांच्या चाचण्या होऊन एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 580 चाचण्यांमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात 1992 रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.